पुण्यात मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन तरुणाचा फावड्याने मारहाण करून खुन, 6 जण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन तरुणाला फावड्याने मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला. चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन ६ जणांना अटक केली आहे.

अमित ऊर्फ आण्णा बजरंग माने, पद्माकर चितलेवाड, संदीप किसन कुसाळकर, गणपती लेहार, आकाश दौंडकर आणि सागर विटकर (सर्व रा. मेदनकरवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आकाश बाबुराव शेलार (वय २०, रा. अमृतनगर, मेदनकरवाडी, ता. खेड) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बाबुराव नामदेव शेलार यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना मेदनकरवाडीत ४ ऑगस्ट रोजी घडली होती.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आकाश शेलार याने स्वामी समर्थ शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलीची छेड काढल्याचा संशय आरोपींना होता. त्यांनी ४ ऑगस्टला रात्री आठ वाजता बालाजीनगर येथील बसस्टॉपवर गाठले. त्यांनी हातातील फावड्याचे दांडक्याने डोक्यात, पाठीवर मारहाण करुन जबर जखमी केले. त्याच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार करण्यात येत होते. उपचार सुरु असतानाच ११ ऑगस्टला त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दखल करुन ६ जणांना अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like