भाजपाची ‘यांनी’ झोप उडवली : शरद पवार

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूकीच्या प्रचारफेऱ्यांचा आज शेवटचा दिवस आहे. या दरम्यान विरोधक एकमेकांवर दावे प्रतिदावे करत आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात पवार कुटूंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवारांनी दंड थोपटले आहेत. कर्जतमधील प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी भाजपवर टीकास्त्र डागले, पवार म्हणाले की भाजप सरकारच्या काळात राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत, बेरोजगारी वाढली आहे. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आघाडीच्या पाठिशी आहे. या निवडणुकीत तरुणांनी भाजपची झोप उडविली आहे.

कर्जत जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादीने शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना उमेदवारी दिली आहे. प्रचाराच्या शेवटी सांगता सभेत पवार उपस्थित होते. यावेळी पाऊस असल्याने हेलिकॉप्टर लँड होण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे शरद पवार गाडीने कर्जतला पोहचले. पावसामुळे सभास्थळावर बसण्यास जागा उपलब्ध नव्हती, त्यामुळे उपस्थित लोकांनी सभास्थळावर उभे राहून भाषण ऐकले.

यावेळी प्रचारसभेत भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, रोहितला संधी मिळाल्यास कर्जत जामखेडचा बारामतीसारखा विकास करु, कुस्ती खेळण्यासाठी समोर तगडा प्रतिस्पर्धी पैलवान हवा, कुस्ती कशी खेळतात हे भाजपवाल्यांना 24 तारखेला कळेलच असे म्हणत पवारांनी भाजपला चिमटा काढला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी