धक्कादायक ! मुंबईत पोलिसांवर कोयत्याने वार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मरीन ड्राईव्ह येथे कोयत्याने एका तरुणाने तिघा पोलिसांवर वार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करण प्रदीप नायर असे या तरुणाचे नाव आहे. तो ऑक्रिटेक्ट असल्याचे सांगितले जाते. त्याच्या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना मरीन ड्राईव्ह येथे मध्यरात्री दीड वाजता घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, करण नायर हा ब्रीच कँडी हॉस्पिटलजवळील सिल्व्हर ओक इस्टेटमध्ये राहणारा आहे. त्याला अंमली पदार्थाचे व्यसन असल्याचे सांगितले जाते. काल मध्यरात्री तो रस्त्यावर हातात कोयता घेऊन फिरत होता. त्यावेळी नाकाबंदीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला हटकले. त्यावर त्याने दोन पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचार्‍यांवर कोयत्याने हल्ला केला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.