दुर्दैवी ! आजोबांसाठी रक्ताची पिशवी आणायला गेलेल्या नातवाचा आणि त्याच्या भाऊजीचा अपघाती मृत्यू

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाइन – रुग्णालयात उपचार घेणा-या आजोबासाठी रक्ताची पिशवी घेऊन जाताना भरधाव कारला झालेल्या अपघातात नातवाचा आणि जावयाचा जागीच मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा-आर्वी रोडवर शुक्रवारी (दि. 2) ही घटना घडली.

भूषण चाफले (वय 24 रा. आर्वी) आणि मिलिंद पिंपळकर (वय 32) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्वी येथील एका रुग्णालयात भूषणचे आजोबा उपचारासाठी दाखल आहेत. त्यांना रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरानी भूषणला सांगितले होते. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रक्तासाठी भूषण आणि त्याचा भावोजी मिलिंद हे दोघे आर्वीवरून अमरावती येथील रक्तपेढीत आले होते. तिथून रक्ताची पिशवी घेऊन परतत असताना त्यांची भरधाव कार (एम. एच. 32 ए. एच. 5617) नाल्यावरून शेतात घुसली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कु-हा पोलीस तपास करत आहेत.