‘लव्ह-कॅश-धोका’ ! 7 लाख बुडवलेल्या ‘गर्लफ्रेन्ड’ला अंत्यसंस्काराला बोलावण्यास सांगून युवकाची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेमात धोका मिळाल्याने व आर्थिक फसवणूक झाल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. सदर घटना दिल्लीतील निहाल विहार परिसरात घडली आहे. प्रेयसीने दिलेले दु:ख विसरणे मला शक्य होत नाही आहे. तिच्या मित्रांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा अशी चिठ्ठी लिहून या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली.

हरप्रित सिंह असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून 12 नोव्हेंबर रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या खोलीतून एक चिठ्ठी मिळाली आहे. ज्यात त्याने आपल्या मृत्यूसाठी प्रेयसी आणि दोन मित्रांना जबाबदार ठरवले आहे. मी माझ्या प्रेयसीला 7 लाख रुपये व्याजावर दिले होते. मात्र ते पैसे परत मागितल्यावर तिने मित्रांसोबत मिळून मला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, अशी माहिती त्याने या चिठ्ठीत लिहली आहे.

या चिठ्ठीव्यतिरिक्त पोलिसांना एक व्हिडिओही मिळाला आहे. तसेच खूप प्रयत्न केल्यानंतरही प्रेयसीने दिलेले दु:ख विसरणे मला शक्य होत नाही आहे. तिच्या मित्रांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूची बातमी आणि माझा शेवटचा फोटो फेसबूकवर अपलोड करा. माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा, असा मेसेज हरप्रीतने आपल्या एका मित्राला पाठवला होता. दरम्यान पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like