चक्क OT मध्ये अश्लील गाण्यांवर चालू होता ‘डिस्को डान्स’, बनवत होते ‘TikTok’ व्हिडिओ

नवी दिल्ली :वृत्तसंस्था : बिहारमधील आरा जिल्ह्यातील सदर हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये रूग्णांवर उपचार झाला किंवा नाही झाला याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु काही लोक भोजपुरी गाण्यांवर टिक टॉक व्हिडिओंसाठी नाचताना जरूर दिसतात. गाणीही इतकी अश्लील आहेत की लोकांचे डोळे लज्जाने वाकतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तथापि, हा व्हिडिओ कधी बनवला आणि कोणत्या दिवशी झाला हे माहित नाही.

या टिक टॉक व्हिडिओमध्ये काही तरुण भोजपुरी अश्लील गाण्यांवर जोरदारपणे डान्स करताना दिसत आहेत. डान्स सादर करणारे तरुण रूग्णालयातील कर्मचारी आहेत की बाहेरील हे अद्याप समजले नाही.

ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये हा टिक टॉक व्हिडिओ बनविला गेला तो इमर्जन्सी वॉर्डचा आहे. जेथे रुग्णांना २४ तास वैद्यकीय सेवा दिली जाते. जेव्हा या व्हिडिओबद्दल हॉस्पिटल व्यवस्थापनाला कळले तेव्हा दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

या ऑपरेशन थिएटर आणि इमर्जन्सी वॉर्डात डॉक्टर, कंपाऊंडर, ड्रेसर, एएनएम, जीएनएम आणि वॉर्ड बॉय यांची ड्युटी तीन शिफ्टमध्ये कायम आहे. तसेच आपत्कालीन वॉर्डच्या मुख्य गेटवर आणि डॉक्टर्स केबिजवळ सुरक्षा रक्षक देखील आहेत. असे असूनही, ही घटना घडली.

व्हिडिओमध्ये तरुणांना नाचताना पाहून रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच सदर रुग्णालयात अशा घटना सामान्य असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सर्प-विंचूसारखे विषारी प्राणी देखील हॉस्पिटलच्या आवारात नजरेस पडतात त्यामुळे येथे सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नाही असे देखील तेथील नागरिकांनी सांगितले.

आरा सदर रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन ललितेश्वर प्रसाद झा यांना या वायरल व्हिडिओबद्दल विचारले असता ते म्हणाले की, त्यांना या प्रकरणाची माहिती नाही. परंतु ते दोषींवर कडक कारवाई करतील.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/