Post_Banner_Top

विधायक ! ‘या’ आमदाराने चक्क बलात्काराचा आरोप केलेल्या महिलेबरोबर केले लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बलात्कार पीडितेला लवकर न्याय मिळत नाही, हे आपण नेहमी पाहत असतो. मात्र त्रिपुरामध्ये एका आमदाराने चक्क त्याच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या महिलेबरोबर लग्न केले आहे. त्रिपुरा सरकारमधील सहभागी पार्टी आईपीएफटी (Indigenous People’s Front of Tripura) या पक्षाचा हा आमदार असून त्याच्यावर या महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला  होता.

याआधी त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला  होता, मात्र न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावल्यानंतर ८ दिवसांच्या आत त्याने या महिलेशी विवाह केला. या महिलेने या आमदारावर आपली फसवणूक करत आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला  होता. त्या आमदाराविरोधात तिने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला  होता. याविषयी आमदारांना विचारले असता त्यांनी विवाह केल्याचे कबुल केलं आहे.

दरम्यान, महिलेने २० मे रोजी या आमदाराविरोधात आपल्याबरोबर संबंध ठेवत आपली फसवणूक केली असल्याचा आरोप  केला होता. लग्नाचे आमिष दाखवून आपला लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोपदेखील या महिलेने केला होता.

Loading...
You might also like