धक्कादायक ! ‘दारू’ विक्री सुरू झाली पण बारामतीत सरपंचाच्या पती मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे राज्यभरात दीड महिन्यांपासून बंद असलेली दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. दुसरीकडे मात्रा, दारु समजून विषारी द्रव प्यायल्याने बारामतीत शिरष्णे गावच्या महिला सरपंचाच्या पतीचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रय वाघमारे असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यासह त्यांच्या अन्य मित्रांनी गेल्या चार दिवसांपूर्वी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या स्पिरिटसारख्या विषारी द्रवाचे प्राशन केले होते.

दत्तात्रय त्यांच्यासह त्यांच्या अन्य मित्रांनी गेल्या चार दिवसांपूर्वी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या स्पिरिटसारख्या विषारी द्रवाचे प्राशन केले होते. लॉकडाउनच्या काळात दारू समजून ते प्राशन केले होते. स्पिरिट प्यायल्यामुळे सातही जणांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून सर्वांवर उपचार सुरू होते. परंतु, आज दत्तात्रय वाघमारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात लॉकडाउन 3 टप्प्याला सुरुवात झाली आहे. या तिसर्‍या टप्प्यात काही जिल्ह्यांमध्ये अटी शिथील केल्या आहे.

त्यात दारू विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. परंतु, दारूची दुकाने उघडली असली तरीही धक्कादायक घटना घडत आहेत. दरम्यान, लॉकडाउनच्या दुसर्‍या टप्पात जीवनावश्यक वस्तू वगळता दारू विक्रीसाठी बंदी होती. त्यामुळे तळीरामांची गैरसोय झाली होती. या काळात अनेक तळीरामांनी दारू मिळवण्यासाठी धडपड केली.