कॅनॉलच्या पाण्यात वाहून गेला तरुण

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – दौंड तालुक्यातील चौफुला येथे उजवा मुठा कॅनॉलमध्ये एक ४५ वर्षीय तरुण वाहून गेल्याची खळबळ जनक घटना घडली असून या तरुणाला शोधण्यासाठी यवत पोलीस, जलसंपदाचे कर्मचारी आणि नागरिकांनी  मोठी शोध मोहीम रावबावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,दौंड तालुक्यातील चौफुला येथे वास्तव्यास असणारे राजेश शिंदे हे ४५ वर्षीय गृहस्थ रोजच्या सवई प्रमाणे सकाळी व्यायाम करण्यासाठी ते नवीन मुठा उजवा कॅनॉलच्या कडेला गेले होते. व्यायाम करत असतानाच त्यांचा तोल जाऊन ते कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पडल्याचे त्यांच्या मुलाने पाहिले आणि त्याने मदतीसाठी नागरिकांना आवाज दिला. यावेळी काही नागरिकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत यवत पोलिसांसह जलसंपदाचे कर्मचारी यांचेही पथक तेथे पोहोचून त्यांनी मोठी शोध मोहीम राबवली. परंतु आठ तास उलटून गेल्यानंतरही राजेश शिंदे यांचा कुठलाच तपास लागत नसल्याने त्यांच्याबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.