Covid-19 In India : आता युवक बनताहेत ‘कोरोना’ची सोपी शिकार, 40 वयापेक्षा कमी असलेल्या रूग्णांची संख्या 34 टक्क्यांनी वाढली
मुंबई : देशात कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग कमी होताना दिसत नाही. दरम्यान, देशातील तरूणांच्या मोठ्या संख्येचे म्हणणे आहे की, कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता त्यांना खुपच कमी आहे. मात्र, आकडे काहीतरी वेगळेच सांगत आहेत. आकड्यांचा विचार केला तर मुंबईच्या अनेक हॉस्पीटलमध्ये सध्या आयसीयूमध्ये कोरोनाच्या एकुण प्रकरणांपैकी सुमारे 30 टक्के रूग्ण तरूण आहेत. त्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. सप्टेंबरमध्ये तरूणांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे 34 टक्के वाढली. ही माहिती मुंबईतील टॉप डॉक्टर्सकडून समोर आली आहे.
हॉस्पीटलच्या माहितीनुसार, तरूणांमध्ये हा ट्रेंड दिसून येत आहे की, जर त्यांच्यात कोरोना संसर्गाची लक्षणे दिसली तरी ते डॉक्टर किंवा हॉस्पीटलशी संपर्क साधण्याऐवजी स्वत:च औषधे घेतात. ते कोविडची टेस्टसुद्धा करत नाहीत आणि जेव्हा त्रास वाढतो तेव्हा हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी धावपळ करतात. मुंबईच्या डॉक्टरांनुसार एकुण कोरोना रूग्णांपैकी 31.15 टक्के रूग्ण तरूण आहेत. कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या एकुण लोकांमध्ये त्यांचा सहभाग सुमारे 4.76 टक्के आहे.
आकड्यांनुसार बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून मुंबईमध्ये संचालित मोठ्या कोविड 19 सेंटरमध्ये 25 टक्के रूग्ण 40 वर्षांच्या वयापेक्षा कमी आहेत. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ही संख्या 30 टक्के आहे. तर फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हा आकडा 16 टक्के आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून मुंबईमध्ये संचालित मोठ्या कोविड 19 सेंटरचे डॉक्टर राजेश डेरे यांच्यानुसार, आता हे दिसून येत आहे की, तरूण रूग्ण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरीच औषध करत आहेत. जेव्हा स्थिती बिघडते तेव्हा ते हॉस्पीटलमध्ये भरती होतात. जेव्हा डॉक्टर त्यांची तपासणी करतात, तेव्हा त्यांच्यापैकी बहुतांश माइल्ड किंवा मॉडरेट कॅटेगरीत संक्रमित आढळतात.