नग्न होऊन ‘त्या’ विदेशी महिलेनं नदीत उडी मारली, ‘जिगरबाज’ पोलिस निरीक्षक वाचवण्यासाठी गेल्यावर तिनं ‘चावल’

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील द्रव्यवती नदीमध्ये एका विदेशी महिलेने अचानक उडी मारल्याची घटना समोर आली होती. या महिलेने नदीत उडी मारलेली पाहून उपस्थित लोकांनी पोलीसांना माहिती देत त्यांना बोलावून घेतले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला वाचवले आहे. या महिलेचे नाव ओशीन मिशेल भाकरे असं असून ती मूळ भारतीयच आहे. तसंच ती ओमान मस्कट येथील रहिवासी आहे.

घटनेच्या काही काळापूर्वी ही महिला नदीच्या काठी चालत होती. अचानक मुलीने आपले कपडे काढून नदीत उडी मारली. मुलगी पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहू लागली. नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. तेव्हा नदीच्या पाण्यावर या मुलीच्या डोक्याचे केस दिसले. त्यानंतर पोलिस स्टेशनचे एसएचओ सुरेंद्र यादव यांनी कोणताही विचार न करता पाण्यात उडी घेतली. सोबत कॉन्स्टेबल गणेश यांनीही पाण्यात उडी घेतली. बरीच मेहनत घेतल्यानंतर मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात त्यांना यश आले.

सुरेंद्र यादव जेव्हा महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा ती त्यांना विरोध करत होती. ती बाहेर येण्यास तयार नव्हती. तिने हात पाय मारले. तसंच तिने सुरेंद्र यादव यांना चावल्याचेही समोर आले आहे. तरिही सुरेंद्र यांनी दिला जिद्दीने बाहेर काढले. मात्र बाहेर आल्यानंतरही ती महिला पुन्हा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करीत होती. त्यामुळे सर्वच आश्चर्य व्यक्त करत होते.

दरम्यान, त्या महिलेला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. या महिलेचे आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापही समोर आले नाही. पोलीसही यावर विचारपुस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त