पुण्यातील सदाशिव पेठेत भररस्त्यावर तरुणीचा ‘विनयभंग’, हॉटेलमधील कर्मचाऱ्यास अटक

पुणे : बोल्ड न्यूज़ २४ ऑनलाइन – राज्यात महिल्यांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत असताना पुण्यातील मध्य वस्तीतील रस्त्यांवरुनही जाण्याची तरुणींना सोय राहिलेली नाही. गेल्या आठवड्याभरात सदाशिव पेठ या मध्य वस्तीतील रस्त्यावर भरदिवसा तरुणींचा वियनभंग केल्याचा तीन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज घनशाम बहादूर थापा (रा़ साई शिवनेरी हॉटेल, विठ्ठल मंदिराजवळ, सदाशिव पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी नवी पेठेत राहणाऱ्या एका २१ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना नवी पेठेतील श्रीराम मेडिकल जवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली होती.याबाबत पोलिसांनी सांगितले की, राज थापा हा मुळचा नेपाळचा आहे. ही तरुणी बुधवारी रात्री कामावरुन घरी जात असताना राज थापा हा तिच्याकडे बघत हसून तिचा पाठलाग करु लागला.

मेडिकल दुकानाजवळ त्याने फिर्यादीला स्पर्श करुन तिचा हात ओढला व तिची मान तिरकी हालवून फिर्यादीला इशारे करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.