तुमच्या AAdhaar क्रमांकाचा गैरवापर झालाय? जाणून घ्या कसं शोधाल घर बसल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आधार कार्ड हे एक महत्वपूर्ण डॉक्युमेंट झालं आहे. खासगी आणि सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक असते. याबाबत एक नवीन माहिती समोर येते. ती म्हणजे आपण आपल्या आधार कार्डच्या कोणत्याही गैरवापराबद्दल तपासणी करायला हवाय. आधारने (UIDAI) जारी केलेला १२ – अंकी युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक आहे, यामध्ये आयरिस स्कॅन आणि फिंगरप्रिंट्स जन्म तारीख आणि पत्त्यासारख्या व्यक्तीचा सविस्तर माहिती समाविष्ट आहे, तर आपण आपले आधार कार्ड कसे वापरत आहात, किंवा कसे लक्ष ठेऊ शकतो. हे जाणून घ्या.

काय आहे प्रक्रिया ?

व्यक्तीने आपला फोन क्रमांक UIDAI कडे नोंदणीकृत केला असेल आणि तो आपल्या आधारशी लिंक केला असेल तर व्यक्तीच्या अधिकृतच्या अखेरचा ६ महिन्यांचा रेकॉर्ड तपासू शकणार आहे. तसेच, UIDAI ने १२ अंकी UID नंबर जारी केला आहे. या टप्प्यांचे पालन करून व्यक्ती UIDAI वेबसाईटवर आपल्या आधार कार्डचा इतिहास तपासू शकता.शोधू शकते.

या पद्धतीनुसार आधार कार्डचा इतिहास तपासू शकता –

– पहिल्यांदा https://resident.uidai.gov.in/ वर लॉगिन करणे.

– Aadhar Services’ च्या तिसर्‍या कॉलममध्ये ‘Aadhaar authentication history’ वर क्लिक करा.

– आपला आधार नंबर आणि सुरक्षा कोड भरणे.

– यानंतर ‘Generate OTP’ वर क्लिक करा.

– ‘नंतर Send OTP’ वर क्लिक करा. आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आपल्याला एक OTP मिळणार आहे.

– OTP मध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला चौकशी तपशील जसे की व्यवहारांची संख्या, व्यवहार केव्हा झालेला कालावधी इ. भरण्यास सांगितले जाईल.

– OTP दाखल केल्यावर ‘submit ’ वर क्लिक करणे.

– आपल्या रेकॉर्ड केलेल्या कालावधीवेळी तारीख, वेळ यांसारख्या इतिहासाची आपल्याला माहिती होणार आहे.

असा करा आधार लॉक –

आधार लॉक करण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून १९४७ वर GETOTP sms लिहून सेंड करावा लागेल. यानंतर मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. या OTP ला १९४७ या नंबरवर ‘LOCKUID आधार नंबर’ लिहून पुन्हा सेंड करावा लागेल. यानंतर आधार कार्ड लॉक होईल. यामुळे तुमच्या आधार माहितीचा गैरवापर होणार नाही, यामुळे अनेक वेळा अपात्र लोक आधार कार्डशी संबंधित माहितीचा फायदा घेऊन सरकारी योजनांचा लाभ घेतात.