Post_Banner_Top

व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांनो सावधान ! तुमचेही अकाउंट होऊ शकते बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- व्हॉट्सॲपने अलीकडेच टीडीपीचे राज्यसभा खासदार सीएम रमेश यांचे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन केले आहे. खासदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. यावर व्हॉट्सॲपने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. व्हॉट्सॲपने चांगली सेवा देता यावी यासाठी कंपनीने काही बदल केले आहेत. सोबतच व्हॉट्सॲपचा चुकीचा वापर करणाऱ्यांविरोधात गंभीर दखलही घेतली आहे. राज्यसभा खासदाराप्रमाणे अन्य कोणत्याही युजरचे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन करू शकते. आता तुमचे अकाऊंट नेमक्या कोणत्या कारणामुळे बॅन होण्याची शक्यता आहे याविषयी…

व्हॉट्सॲपचे नियम आणि अटी इन्स्टॉल करतानाच आपण त्या मान्य (Agree) करतो. याचे उल्लंघन झाल्यास आपल्याला बॅन करण्यात येते. जरी एखाद्या युजरने आपल्या विरोधात तक्रार केली नसली तरी आपल्याला बॅन करण्यात येते.

भडकावणारे, अश्लील किंवा कोणाचा अपमान करणारे मेसेज पाठवल्यास अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकते.

एखाद्या गुन्ह्याला पाठिंबा देणारे मेसेज पाठवल्यास अकाऊंट ब्लॉक होऊ शकते.

व्हॉट्सॲपच्या कोडींगमध्ये बदल किंवा छेडछाड केल्यास तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकते.

युजरच्या फोनमध्ये व्हायरस जाईल अशी लिंक पाठविल्यास लिंक पाठवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई म्हणून तुमचे अकाऊंट बंद केले जाऊ शकते.

दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने अकाऊंट बनवले आणि ते वापरले तरीही तुमचे अकाऊंट बॅन करण्याची शक्यता आहे.

अनोळखी व्यक्तीला सतत मेसेज करत राहिल्यासही बॅन करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

व्हॉट्सॲपचे सर्व्हर हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा दुसऱ्या एखाद्या युजरवर नजर ठेवल्यास तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकते.

विशिष्ट धर्म किंवा धार्मिक स्थळाविषयी द्वेष पसरेल अशी माहिती पसरवल्यास त्या व्यक्तीचे अकाऊंट बंद करण्यात येऊ शकते.

व्हॉट्सॲप प्लससारखी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स वापरल्यास तुमचे मूळ अकाऊंट कंपनीकडून बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुमच्या विरोधात व्हॉट्सॲपकडे अधिक तक्रारी केल्या गेल्या असतील तरही तुमचे अकाऊंट बंद केले जाऊ शकते.

व्हॉट्सॲप सध्या जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमधील ताईत झाले आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटात या ॲप्लिकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. मात्र सायबर सिक्युरीटीच्यादृष्टीने प्रत्येकाने व्हॉट्सॲप वापरताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Loading...
You might also like