सावधान ! ‘या’ 12 प्रकारच्या ‘ईमेल’वर चुकूनही करु नका ‘क्लिक’, ‘चोरी’ होऊ शकते तुमची ‘खासगी’ माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज ज्याप्रकारे इंटरनेटचा वापर वाढला आहे तसतसा सायबर क्राइमच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपासून सिक्यूरिटी फर्म बराक्युडा नेटवर्कने ३.६ लाख ईमेलवर रिसर्च केला आणि त्यात आढळले की असे १२ फसवेगिरी करणारे ईमेल सब्जेक्ट लाइन आहे ज्याने आधिकतर लोकांना Email येतात. आश्चर्य करणारी गोष्टमध्ये ईमेल सर्वात कमकुवत माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक लोक धोकादायक लिंक किंवा मालवेअरचे शिकार होतात.

जेव्हा आपल्याला एखादा ईमेल येतो तेव्हा न वाचताच बऱ्याचदा तो ईमेल ओपन करतो. परंतू ईमेलची सब्जेक्ट न वाचताच आणि ईमेल कोठून आला आहे याची तपासणी न करताच बेजबाबदारपणे ईमेल ओपन करतो आणि हॅकर्स आपले अकाऊंट हॅक करतात.

असे अनेक ईमेल आपल्याला येतात ज्यात सबजेक्ट लाइन तर वेगळ्या असतात आणि आधिकाधिक फसवेगिरी करणारे हॅकर्स या ईमेलचा वापर करतात.

कोणते आहेत ते ई-मेल 

यात अनेक ई मेल असतात ज्यात आपले ईमेेल सहज हॅक होऊ शकतात, यामुळे आपल्या मोबाइल किंवा इतर डिवाइसमधील डाटा चोरी करण्यात येत असतो.

१. Invoice Due

२. Follow Up

३. Request

४. Are you available?/Are you at your desk

५. Payment Status

६. Hello

७. Purchase

८. Urgent/Important

९. Re:

१०. Payroll

११. Expenses

१२. Direct Deposit

बँक अकाऊंटशी संबंधित काही खासगी माहिती असेल किंवा इतर कोणतीही खासगी माहिती अनेकदा ही माहिती आपल्या ईमेल वर असते. ज्या ई मेलचा सबजेक्ट या १२ प्रकारचा असतात. यातील कोणत्याही प्रकारचा ई मेल तुम्हाला आला तर मात्र सावध व्हा कारण यातून तुमची खासगी माहिती चोरली जाऊ शकते. ई मेल वरुन तुमचे डिवाइस हॅक करुन डेटा चोरला जातो.

आरोग्यविषयक वृत्त