home page top 1

SBI कडून सावधानतेचा इशारा, एका लहान चुकीमुळे तुमचे बँक खाते होवु शकते रिकामे

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. भारतात सातत्याने होणाऱ्या बँकेच्या धोकादायक व्यहारांपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेने SBI च्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बँकेच्या व्यवहारासंबंधी घोटाळा फक्त ऑनलाईन ट्रँजॅक्शन मधूनच होत नाही तर ATM च्या माध्यमातून देखील घोटाळे केले जात आहेत.

या मार्गाने होऊ शकतो गैरव्यवहार
सार्वजनिक डिव्हाईस, ओपन नेटवर्क तसेच फ्री वायफाय चा वापर केल्यामुळे तुमच्यासोबत धोका होऊ शकतो. यांचा वापर केल्यामुळे तुमची वैयक्तिक आणि महत्वाची माहिती लीक होण्याचा धोका असतो आणि तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

तुम्हाला तुमच्या बँक खात्याची आणि नेट बँकिंगची माहिती फोनमध्ये सेव्ह करून ठेवली नाही पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बँक खात्याचा नंबर, पासवर्ड, ATM कार्डाचा नंबर, किंवा अन्य बँकेसंबंधी महत्वपूर्ण माहिती सेव्ह करून ठेवत असाल तर ही माहिती सहज लीक होऊ शकते.

अशी घ्या काळजी
अशा घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी कोणत्याही फ़िशिंग (संशयित) इमेलवर क्लिक केले नाही पाहिजे. ऑनलाईन व्यवहार करताना वन टाइम पासवर्ड (OTP) च वापर केला पाहिजे. OTP च्या वापरामुळे संभाव्य धोका आपण टाळू शकतो.

आपल्या बँकेचा पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड वेरिफिकेशन कोड आणि यूपीआय पिन कोणालाही शेअर केला नाही पाहिजे. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर तो पुन्हा व्यवस्थिपणे मिळवता येऊ शकतो.

सिनेजगत
कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा
अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……
#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया
#Video : कटरीना हिल्स घालून ‘हुस्न परचम’ गाण्यावर लावते ठुमका…

Loading...
You might also like