नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) म्हणजे जीव की प्राणच. पीएफच्या हिशोबानं खाजगी कंपन्यांत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एप्रिल महिन्यात बऱ्याचदा खाजगी क्षेत्रात या महिन्यात कंपन्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफच्या पैशांना या महिन्यात दुप्पट करता येण्याची संधी आहे.
अशी होईल पीएफची रक्कम दुप्पट –
या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कंपनीच्या एचआर विभागाशी संपर्क करावा लागेल व पीएफची रक्कम वाढवावीअशी विनंती करावी लागेल. त्यामुळे महिन्याचा पगार कमी मिळेल मात्र हाच वाचवलेला पैसा बचतीसाठी आणि कर वाचवण्याच्या दृष्टीनं चांगला पर्याय असेल. त्यामुळे तुमची पीएफ रक्कम दुप्पट करेल.
उदा. एखाद्या कर्मचाऱ्यानं आपलं मासिक समभाग दुप्पट केला तर त्याच्या पीएफ फंडची रक्कम आपोआपच दुप्पट होईल. म्हणजेच, सध्याच्या व्यवस्थेत मूळ वेतनावर १२% पीएफचा सहभाग असतो. परंतु, जर कर्मचाऱ्यांनी तो समभाग वाढवून २४ % केला तर पीएफ फंड दुप्पट होईल.
अशी आहे योजना –
कंपनीकडून पीएफ फंड वाढवण्यात आला तर तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये प्रत्येक महिन्याला पीएफ फंडमध्ये जास्त पैसे जमा होतील. पीएफ कन्ट्रीब्युशन वाढवण्यात आलं तर निवृत्तीच्या वेळी तुमचा हाच पैसा दुप्पट होईल. सध्या एम्प्लॉईज प्रोव्हिडन्ट फंड म्हणजेच EPF वर ८.५५ % व्याजदर मिळतो. पीएफचा समभाग वाढल्यानं त्यावर मिळणारं व्याजही अधिक असेल.
पीएफसाठी ईपीएफओचा नियम –
एम्प्लॉईज प्रॉव्हिडन्ट फंड (EPFO) कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम वाढवण्याचा हक्क मिळतो. मूळ वेतन आणि डीएच्या १२ % रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडमध्ये जमा होते. तेवढीच रक्कम कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होते. कोणताही कर्मचारी आपला मासिक समभाग मूळ वेतनाच्या १०० टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो. ईपीएफओच्या नियमानुसार कर्मचारी आपल्या कंपनीला सांगून आपल्या पीएफ कन्ट्रीब्युशनमध्ये वाढ करू शकतात.