सावधान ! ‘या’ 7 गोष्टींसाठी देखील होऊ शकतो तुम्हाला पोलिसांकडून दंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ट्राफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागत आहे. यामुळे वाचण्यासाठी लोक आता ट्राफिकच्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. गाडीची सर्व कागदपत्रे असूनही तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. जाणून घेऊयात कसे-

1) कारमध्ये मोठ्या आवाजात म्युजिक ऐकल्यावर भरावा लागणार दंड
कारमध्ये जोर जोरात आवाज करून म्युजिक लावले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आवाज मोठा करून म्युजिक ऐकणे हे नियमांच्या बाहेर असल्यामुळे यासाठी तुम्हाला 100 रुपये दंड भरावा लागू शकतो.

2) कारमध्ये जास्त लोकांना बसवल्यास भरावा लागेल दंड
कारमध्ये जेवढे सीट्स आहेत त्यापेक्षा अधिक व्यक्तींना बसवल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. यामध्ये तुम्हाला प्रति सिट 200 रुपये दंड भरावा लागू शकतो.

3) ट्राफिक वाढवल्यामुळे भरावा लागू शकतो दंड
ट्राफिकमुळे सगळ्यांनाच त्रास होत असतो परंतु जर तुमच्या चारचाकी वाहनामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम झाले तर अशा स्थितीत तुमच्या वाहनावर 500 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या गाडीमुळे ट्राफिक जाम होणार नाही याची काळजी घ्या.

4) वायपर नसल्यामुळे भरावा लागू शकतो दंड
पावसाळ्याच्या काळात बिना वायपर गाडी चालवणे मोठे जोखमीचे काम असते, त्यामुळे जर वायपर नसेल तर अपघात देखील होऊ शकतात. ट्राफिक नियमाप्रमाणे जर तुमच्या गाडीला वायपर नसेल तर तुम्हाला 100 रुपये दंड भरावा लागेल.

5) साईड मिरर नसेल तरीसुद्धा भरावा लागेल दंड
जर तुमच्या कारला साइड मिरर नसेल तर तुम्हाला 100 रुपये दंड भरावा लागू शकतो त्यामुळे मिरर काढून ठेवला असेल तर तो बसवून घ्या.

6) जोरात हॉर्न वाजवला तरीसुद्धा भरावा लागेल दंड
काही लोकांना आपल्या गाडीला मोठा आवाज करणारा हॉर्न बसवण्याची सवय असते जे की ट्राफिक नियमांच्या विरोधात आहे. अशात जर तुम्हाला कर्कश हॉर्न जोरात वाजवताना पकडण्यात आले तर तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

7) गाडी मॉडिफाय केल्यामुळे भरावा लागू शकतो दंड
गाडी अजून चांगली दिसण्यासाठी अनेकांना आपल्या गाडीला मॉडिफाय करण्याची आवड असते. मात्र जर तुम्ही गाडीच्या मूळ स्वरूपात बदल होणारे प्रकार करणार असाल तर तुम्हाला 15 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच गाडी मॉडिफाय केल्याबद्दल एखाद्या दुकानधारकाला देखील याबाबत दंड आकारला जाऊ शकतो.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी