आजपासून तुमचं ‘DL’ आणि गाडीची RC बदलणार, ‘हा’ बदल होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून (1 ऑक्टोबर) ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि आरसीचे (RC) स्वरूप बदलणार आहे. या नव्या बदलानुसार वाहन चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचे स्वरूप संपूर्ण देशातील सर्व वाहनचालकांसाठी समान असेल. ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचा रंग, डिझाइन, लुक आणि सुरक्षेचे फिचर्स एकसारखेच असणार आहेत.

मायक्रोचिप आणि क्यूआर कोड
नव्या नियमानुसार स्मार्ट ड्रायविंग लायसन्स आणि आरसीमध्ये मायक्रोचिप आणि क्यूआर कोड असणार आहे. याद्वारे देशातील प्रत्येक राज्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, आरसीचा रंग आणि प्रिंटींग एकसारखी असणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे. आतापर्यंत, प्रत्येक राज्यानुसार ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीचे स्वरूप भिन्न आहे. पण आता असं होणार नाही. क्यूआर कोड (QR COAD) आणि चिपमध्ये मागील सर्व रेकॉर्ड असतील.

पूर्ण वाहन रेकॉर्ड वाचले जाऊ शकते
ड्रायव्हर किंवा वाहनाबद्दलचा संपूर्ण डेटा क्यूआर कोडद्वारे केंद्रीय डेटा बेसमधून वाचला जाऊ शकतो. वाहतूक पोलिसांना क्यूआर कोड वाचण्यासाठी हँड ट्रॅकिंग डिव्हाइस देण्यात येणार आहे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट प्रत्येक ड्रायव्हरच्या डीएलच्या मागील बाजूस देखील लिहिला जाईल. या नंबरवर पोलीस किंवा कोणताही वाहन चालक अडचणीत असल्यास संपर्क साधू शकेल. या बदलानंतर पोलिस वाहतुकीची जबाबदारी सांभाळू शकतील, असे परिवहन विभागाचे अधिकारी सांगत आहेत.

अडचण काय ?
ड्रायविंग लायसन्स आणि आरसी संदर्भात प्रत्येक राज्य स्वतःचे वेगळे स्वरूप तयार करत आहेत. काही राज्यांची माहिती सुरुवातीला आहे तर काहींनी मागच्या बाजूस छापली आहे. परंतु सरकारच्या नव्या निर्णयानंतर ड्रायविंग लायसन्स आणि आरसीची माहिती त्याच ठिकाणी असेल.

Visit : policenama.com