तुम्ही खात असलेल्या रोजच्या वापरातील पदार्थांमधील भेसळ ओळखण्यासाठी ‘या’ 13 खास ट्रीक्स, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – आजकाल अनेक पदार्थ हे भेसळयुक्त मिळतात. परंतु आज आपण काही रोजच्या वापरातील पदार्थांमधील भेसळ ओळखण्यासाठी काही खास टीप्स जाणून घेणार आहोत.

1) चीज स्लाईस जर जळून गळू लागलं तर समजून घ्या ते ओरिजनल आहे. गळण्याऐवजी ते जर काळं पडलं तर समजून घ्या डुप्लीकेट आहे.

2) तांदळात प्लास्टिकच्या दाण्यांची भेसळ केली जाते. एका गरम भांड्यात कच्चे तांदूळ घ्या. जे तांदूळ प्लास्टिकचे असतील ते वितळतील.

3) बेबी फूड मध्ये फोर्टीफाईड कॅल्शियम आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी एका छोट्या पॉलिथिनमध्ये बेबी फूड टाका. त्यावरून चुंबक फिरवा. जेवढं फोर्टीफाईड कॅल्शियम असेल ते चुंबकाला चिकटेल.

4) व्हिटॅमिनची टॅबलेट खरी आहे की खोटी आहे हे चेक करण्यासाठी काही टॅबलेट बेक करण्यासाठी ठेवा. ज्या नॅचरल असतील त्या गळणार नाहीत. जर त्या सिंथेटीक असतील तर गळतील.

5) आईसक्रीममध्ये जर लिंबू पिळलं तर त्याला काही फरक पडता कामा नये. परंतु जर त्याला फेस आला तर समजून घ्या की काहीतरी घोळ आहे. एकतर ते डुप्लीकेट असेल किंवा त्यात डिटर्जंट मिसळलं असेल.

6) दुधातील भेसळ जर ओळखायची असेल तर त्यात Seaweed टाका. हे टाकल्यानंतर जर दुधाचा रंग बदलला तर समजून दूध डुप्लीकेट आहे.

7) ऑईल व पाणी यांचं मिश्रण करून कॉटन बडच्या मदतीनं हे रताळ्यावर घासा यामुळं त्यातील हानिकारक रंग निघून जातो.

8) एक ग्लास पाणी घ्यात त्यात एक चमचा कॉफी टाका. जर पाण्याचा रंग बदलत नसेल तर समजून घ्या ती कॉफी डुप्लीकेट आहे. कारण ओरिजनल कॉफीनं लगेच पाण्याचा रंग बदलतो.

9) काही वेळेस रंग लावलेली मटार दिली जाते. यासाठी पाण्यात टाकून मटार उकडून घ्या. यामुळं तिला लावलेला रंग निघून जाईल.

10) जर हळद ओरिजनल आहे किंवा नाही हे चेक करायचं असेल तर हळद जाळा. भेसळ नसेल तर हळद जळेल.

11) मधातही मोठ्या प्रमाणात भेसळ असते. हे ओळखायचं असेल तर मेणबत्ती मधात बुडवून घ्या आणि पेटवा. जर ती पेटली तर समजून घ्या मध खरं आहे.

12) टी बॅगमधील चहापत्ती काढून ती एका बाऊलमध्ये कपडा टाकून त्यात ठेवा. नंतर त्यात थंड पाणी टाका. पाणी टाकताच जर ती चहापत्ती रंग सोडत असेल तर अशी चहापत्ती अजिबात वापरू नका.

13) फळं फ्रेश दिसण्यासाठी त्यावर व्हॅक्स लावलं जातं. हे ओळखण्यासाठी फळं गरम पाण्यात टाका. त्यांना लावलेलं व्हॅक्स निघून जाईल.