वजन नियंत्रित ठेवायचंय तर ‘या’ सवयी टाळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बदललेल्या जीवनशैलीमुळे अलिकडे लठ्ठपणा ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. अशा प्रकारे वजन वाढण्याची कारणे विविध असतात. यासाठी आपले वजन का वाढतेय याची कारणे प्रथम शोधली तर वाढणारे वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत होऊ शकेल. दिनक्रम आणि काही सवयी वजनवाढीसाठी जबाबदार असतात. वजन सतत वाडल्यामुळे शरीर लठ्ठ होते. शिवाय अनेक आजार आपोआपच जडतात. त्यामुळे ही एक गंभीर समस्या झाली आहे. कोणत्या सवयीमुळे वजन वाढते हे आपण जाणून घेतले पाहिजे.

पूर्ण झोप ही आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वाची आहे. झोप पूर्ण होत नसेल तर वजन वाढू शकते. पूर्ण झोप न घेतल्यामुळे शरीरामध्ये वजन वाढवण्याऱ्या हार्मोन्सचा स्तर वाढतो. त्यामुळे सुमारे ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोप लागण्यासाठी व शरीरी सदृढ राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. एक्सरसाइज न केल्यास शरीरातील कॅलरी बर्न होणार नाहीत आणि चरबी वाढत जाते. आरोग्यासाठी हेल्दी डाएट घेतले पाहिजे. जर आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ नसतील तर, शरीराचे वजन वाढते. जेवणात दूध, दही किंवा अंडी आदीचा समावेश असला पाहिजे. अन्यथा शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस धिम्या गतीने होऊन वजन वाढू लागते. टिव्ही किंवा लॅपटॉपवर काम करताना खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढू शकते.

टिव्ही पाहताना आपले खाण्याकडे लक्ष नसते. शिवाय शरीराल त्याची आवश्यकताही नसते. यास ओव्हर इटिंग म्हणतात. जंक फूडमुळे शरीरातील फॅट्स वाढते. जेवताना फक्त जेवणाकडेच लक्ष दिले पाहिजे. दिवसभरामध्ये ३ लीटरपेक्षा कमी पाणी पित असाल तर शरीरातून नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे अवघड होऊन बसते. शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस स्लो होऊन वजन वाढते. सकाळच्यावेळी नाश्ता केला पाहिजे. सकाळचा नाश्ता टाळल्यास शरीराचा मेटाबॉलिजम रेट कमी होऊन फॅट बर्न प्रोसेस स्लो होते.