मोदी सरकारनं रेशनकार्ड संदर्भात घेतला मोठा ‘निर्णय’ ! आता नाही बनवावं लागणार नवीन Ration Card

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही रेशन दुकानातून रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर, केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीच्या वन नेशन वन कार्ड योजने (One Nation One Card Scheme) अंतर्गत लाभार्थ्यांना एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांकडे जर जुने रेशनकार्ड असेल तर त्यांना नवीन रेशनकार्ड घ्यावे लागणार नाही. त्यांना जुन्या रेशनकार्डच्या माध्यमातून देशातील कोणत्याही भागात रेशन मिळेल. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू झाल्यानंतरही जुने रेशनकार्ड चालूच राहतील. अशी माहिती केंद्रीय अन्न, ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली.

रावसासाहेब दानवे यांनी सांगितले की, ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही लाभार्थ्यास नवीन रेशनकार्ड दिले जाणार नाही. या योजनेतही जुने रेशनकार्ड हे ग्राहकांकडेच राहतील. काही लोक नवीन योजनेत नवीन शिधापत्रिका तयार करावी लागेल असा भ्रम पसरवत आहेत. यासाठी ते काही लोकांकडून पैसे देखील घेत आहेत अशाच एका टोळीला दिल्ली पोलिसांनीही पकडले आहे.

उत्तरप्रदेश, बिहारमध्ये १ जूनपासून होणार की योजना लागू
रावसाहेब दानवे म्हणाले की, देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ही योजना १ जूनपासून राबविण्यात येणार आहे. यासह उत्तराखंड, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशातही ही योजना सुरू करण्याची तयारी सुरू आहे. तथापि, ही योजना जूनमध्ये देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये लागू होईल की नाही याबाबत अजून सांगणे कठीण आहे. कारण दिल्लीत यासाठी अजून कोणतीही आवश्यक तयारी करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.