खुशखबर ! SBI ची ग्राहकांना ‘मोठी’ भेट ; लोन घेणं झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही स्टेट बँक इंडियाचे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून (बुधवार दि 10 जुलै) होम लोन आणि ऑटो लोन स्वस्त झालं आहे. एसबीआयच्या या खास भेटीचा फायदा 40 कोटींहून अधिक ग्राहकांना मिळणार आहे.

भारतीय स्टेट बँकेने आपल्या सर्व मुदतीच्या कर्जावर सीमांत खर्चावर आधारीत व्याज दरात (MCLRमध्ये) 0.05 टक्क्यांनी घट केली आहे. बँकेच्या या निर्णयानंतर एका वर्षाच्या मुदतीच्या होम लोनवर नवीन व्याजदर 0.05 टक्क्यांची घट होऊन 8.40 टक्के झालं आहे. जवळपास 4 महिन्यांमध्ये एसबीआयने व्याजदर घटवण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधीही बँकेने एप्रिल आणि मे मध्ये 0.05 आणि 0.05 टक्क्यांची घट केली आहे. यावेळी एसबीआयने होम लोनवरील व्याज दर 0.10 टक्क्यांनी कमी केले आहे.

एसबीआयने 1 जुलैपासून आपल्या ग्राहकांना रेपो रेटशी संबंधित होम लोन ऑफर करण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ असा की, जेव्हा आरबीआय रेपो रेट मध्ये बदल करेल तेव्हा एसबीआयच्या होम लोनवरील व्याजदरातही वाढ किंवा घट होणार.

image.png

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांना रेपो रेट मधील घटीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केली. त्यानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. शक्तिकांत दास यांनी पदभार घेतल्यानंतर आरबीआयने सलग तीन वेळा रेपो रेटमध्ये घट केली आहे. असे असतानाही बँकांनी ग्राहकांना व्याजदरात अपेक्षेप्रमाणे सूट दिलेली नाही.

image.png

आरबीआयने चलनविषयक धोरणांचे परिक्षण केल्यानंतर रेपो रेटमध्ये 0.25 टक्के घट झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक आणि आयडीबीआय बँकने आपल्या एमसीएलआर दरात 0.05 आणि 0.10 टक्क्यांची घट केली आहे.

 

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात