काय सांगता ! होय, तुमची ‘सही’ सांगते तुमचं आरोग्य, चला दिवाळीपासून आपली स्वाक्षरी बदलून स्वतःची हेल्थ निरोगी ठेवू या

कुणीही कधीही अशी अपेक्षा करत नाहीत की, आपण हॉस्पिटलमध्ये एका आजारासाठी जावे / किंवा आजारी पडावे. जर तुम्ही तुमच्या स्वाक्षरीमध्ये काही चुका करत असाल, तर त्या चुकांची दुरुस्ती करा आणि नेहमी निरोगी राहा. त्यामधील काही बाबींवर आज आपण चर्चा करूयात त्या पुढीलप्रमाणे :-

1. आपल्या सहीमध्ये दोन शब्दांत जर डॉट (टिंब/ विराम चिन्ह) असेल, तर हॉस्पिटलमध्ये वारंवार जावे लागते, म्हणजेच अशा व्यक्ती सतत आजारी पडतात किंवा त्यांना एखादा मोठा आजार होताे, तर कधीही सही करताना दोन शब्दांत डॉट (.) नसावा.

2. सहीमध्ये कुठेही (symbols) नसावेत. काही तरी कलाकृती (style) म्हणून जर काही (symbol) काढत असाल, उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीच्या सहीमध्ये जर मुकुट (ताज) सारखा/ (crown) असेल तर हे अतिशय घातक ठरतं. अशा व्यक्ती मोठ्या आजाराने ग्रासल्या जातात. म्हणून सहीमध्ये अशी चिन्हे नसावीत.

3. सहीमध्ये कधीही वर्तुळ (circle) म्हणजेच (०) नसावेत, यामुळेसुद्धा तुम्हाला जास्त दिवस राहणारे आजार होऊ शकतात .

4. सहीमधल्या दुसऱ्या अक्षराने जर पहिल्या अक्षराला कट करत असेल किंवा खोडत असाल, तर तुमच्या बाबतीत दुर्घटना होऊ शकते आणि जास्त काळाकरिता हॉस्पिटलमध्ये जावे लागेल.

5 काही लोक सहीमध्ये कधी कधी एका अक्षरात दोन अक्षरे काढण्याचा प्रयत्न करतात किंवा दोन अक्षरांना एकत्र करून लिहितात, अशा व्यक्तींना डोकेदुखी/ गळादुखी (migrain/ throat infection) असे शरीराच्या वरच्या भागाचे आजार होतात.

तर मित्रांनो जर तुम्ही वरील सांगितलेल्या चुका आपल्या सहीमध्ये करत असाल तर त्या करणे बंद करा…नक्की तुमच्या आयुष्यात तुम्ही निरोगी राहाल.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (8605112233)

क्रमशः….