नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या जगभरात WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फिचर्सही दिले जात आहेत. मात्र, आता तुम्ही थोडाही बेजबाबदारपणा केला तर तुम्हाला याचा फटका येत्या काही दिवसांत बसू शकतो. तुमचे WhatsApp हॅक झाल्यास तुम्हाला Two-Factor Authentication ही वाचवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आता आणखी सतर्क राहणे गरजेचे आहे.
जेव्हा आपण WhatsApp इन्स्टॉल करता तेव्हा तुम्ही सिमकार्ड आणि नंबरच्या माध्यमातून एसएमएस कोड प्राप्त होतो तेच काम हॅकरही करू शकतो. त्यादरम्यान तुम्हाला 6 अंकी कोड मेसेज येईल तेव्हा तुमच्या फोनवर WhatsApp सुरुच राहील. मात्र, जेव्हा सातत्याने हा कोड तुम्हाला मिळत असेल तर समजून जा की ही हॅकर्सची प्रोसेस सुरु झाली आहे. जेव्हा व्हेरिफिकेशन कोडची मर्यादा संपेल त्यानंतरच्या 12 तासांत पुन्हा नवीन व्हेरिफिकेशन कोड जनरेट केला जाईल. तेव्हाही तुमचे WhatsApp सुरुच राहील. याचदरम्यान तुम्ही तुमच्या फोनवरून WhatsApp डिऍक्टिवेट करून पुन्हा इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करू नका. याचा फायदा हॅकर्सला होऊ शकतो.
तसेच हॅकर एक ईमेल आयडी तयार करेल आणि एक मेल [email protected] वर पाठवेल. WhatsApp ज्या फोनमध्ये इन्स्टॉल होता तो फोन हारवला किंवा चोरीला गेल्याचे सांगेल. त्यामुळे तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच 12 तासानंतर हॅकर्सकडून अटॅक झाला नाही तर तुम्ही पुन्हा कोड जनरेट करून WhatsApp इन्स्टॉल करू शकता. मात्र, जर असे झाले नाही तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.