फ्लिपकार्ट, अमेझॉनला गंडा घालणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फ्लिपकार्ट, अमेझॉनवरून एकदाच अनेक वस्तू मागवून डिलीवरी बॉयला फसवत वस्तू लंपास करणाऱ्या एकाला मोबाईल विक्री करताना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पुणे, औरंगाबाद, नागपुर आणि अमरावती येथील चार गुन्हे उघड करत ४ लाख २१ हजार रुपये किंमतीचे ६ आयफोन प्लस मोबाई, एक डेल कंपनीचा लॅपटॉप, एक रियलमी व रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

अमोल परमानंद तांगडे (वय २२, रा. रावेत, मुळ मु. पो. माळखेड, ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल तांगडे हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी दसरा चौक येथे येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मुळे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दसरा चौकात सापळा रचून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने अमेझॉन व फ्लीपकार्टवर एकाच वेळी वस्तू मागवून डिलीवरी बॉयला फसवत त्या वस्तू लंपास केल्याचे कबूल केले. त्याने नागपूर, पुणे, औरंगाबाद, अमवरावती येथे असे प्रकार केले असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून या ठिकाणचे चार गुन्हे उघडकिस आणत पोलिसांनी ६ आयफोन ७, क लॅपटॉप, दोन मोबईल जप्त केले आहेत. त्याने पुण्यात फ्लापकार्टवरून ६ आयफोन मोबाईल व एक स्मार्ट वॉच मागवत डिलिवरी बॉयला गंडवून ते लंपास केले होते.

ही कारवाई परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे, कर्मचारी बाळासाहेब गायकवाड, एकनाथ जोशी, आबा गुंड,सारस साळवी, प्रकाश आव्हाड, दादासो काळे, संतोष जाधव, तेजस चोपडे, ज्ञानेश्वर मुळे, संजय वाघ, विकास शिंदे यांच्या पथकाने केली.