बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट नोट बाळगल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोहेल उर्फ सलमान खलील खान असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. देविदास चौधरी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

शहरात सध्या देवपुर पांझरा नदी पात्रात यात्रा उत्सव सुरु आहे. तिथे फिरताना भारतीय चलनातील पाचशे रुपये दोन बनावट नोटा घेऊन एक संशयित फिरताना आढळून आला. त्यानंतर चौधरी यांनी देवपुर पोलीस ठाणे गाठत पोलासांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीसांनी शोध मोहिम सुरु केली. त्यांना एक तरुण पाळण्याजवळ आढळला. त्याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तो उडवाउडवी उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता. तेव्हा त्याच्या पँटच्या खिशात पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा सापडल्या.

Loading...
You might also like