कोकीन विक्रीसाठी आलेल्या युवकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोकीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला लष्कर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक करण्यात
आलेल्या आरोपीकडून २३ ग्रॅम कोकीन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई एमजी रोडवरील अरोरा टॉवर येथे मंगळवारी (दि.९) रात्री सव्वानऊच्या सुमारास केली.
नटराज गोपाळ (वय-३४ रा. ढवळे वस्ती, उरळी देवाची, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उप निरीक्षक विशाल दिलीप चव्हाण यांनी सरकारतेर्फे लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’424601b4-cc89-11e8-a54f-93092d720fa5′]

अरोरा टॉवर येथे एकजण कोकीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार शैलेंद्र जगताप यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कर पोलिसांच्या एका पथकाने अरोरा टॉवर परिसरात सापळा रचला. अरोरा टॉवर येथील सार्वजनिक रोडवर आरोपी गोपाळ हा संशयितरित्या पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे ८० हजार ५०० रुपयांचे २३ ग्रॅम वजनाचे कोकीन सापडले. बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गोपाळ याला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी कोकीन, सुझुकी दुचाकी, एम आय कंपनीचा नोट -४ मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49977b14-cc89-11e8-b2db-e31c951add5c’]

ही कारवाई परिमंडळ – २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरिक्षक विशाल चव्हाण, प्रसाद गज्जेवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे, पोलीस हवालदार शैलेश जगताप, गणपत थिकोळे, प्रदिप शितोळे, अमोल राऊत, पवन भोसले, राहुल शिंगे, सागर हुवाळे, आबासाहेब धावडे, मुशरफ पठाण, गणेश ओलोकर यांच्या पथकाने केली.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’515b657b-cc89-11e8-87fd-a52d0ec9b256′]

दोन दिवसांपूर्वी कोंढवा येथील दोराबजी मॉलसमोर एका नायजेरियन कडून २ लाख ७१ हजार ५०० रुपयांचे कोकीन जप्त केले होते. ही कारवाई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली होती. अटक करण्यात आलेला नाजेरियन कोंढवा परिसरात कोकीनची तस्करी करताना पकडले होते. दोन दिवसांत दोन ठिकाणी कारवाई करुन पुणे पोलिसांनी ३ लाखांचे कोकीन जप्त करुन दोघांना अटक केली आहे. पुण्यात अंमली पदार्थाची होत असलेली तस्करी पुणे पोलिसांची डोकेदुखी ठरत असून त्यावर वेळीच अंकुश घालणे गरजेचे आहे.