शिवशाहीतील प्रवाशांच्या लॅपटॉप बॅगा चोरणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवशाहीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लॅपटॉप बॅगा चोरून नेणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे त्य़ाने स्वारगेट बस स्थानकातून ९ बॅगा चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आहत जहर मंडल (घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विजय खोमणे हे स्वारगेट बसस्थानकात गस्त घालत होते. त्यावेळी एकजण खांद्यावर लॅपटॉपची सॅक लावलेला तरुण संशयितपणे एस. टी. स्थानकात फिरत असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांन त्याला हटकल्यावर तो पळून जाऊ लागला. त्यामुळे त्याचा पाठलाग करून त्यांन पकडले. ताब्यात घेऊन स्वारगेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर त्याने शिवशाही बसमधील प्रवाशांच्या लॅपटॉप बॅगा चोरत असल्याची कबूली दिली. त्याने प्रवाशांच्या ९ लॅपटॉप बॅगा चोरल्याची कबूल दिली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक मच्छींद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय खोमणे यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us