‘टीम इंडिया’च्या खेळाडूंना जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल, ATS कडून एकाला अटक

वृत्तसंस्था – बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट बोर्डाला मिळालेल्या एका मेल मधून प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की, भारतीय संघातील खेळाडूंच्या जीवाला वेस्ट इंडिज मध्ये धोका आहे. नंतर क्रिकेट बोर्डाने असे जाहीर केले की, हा एक खोटा मेल होता. तरीही या घटनेनंतर खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ह्या सगळ्या प्रकरणानंतर दहशतवाद विरोधी पथकाने आसाम मधून एका युवकाला अटक केले. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव ब्रजमोहन दास आहे. असं मधील मोरगाव येथील राहणारा आहे.

बीसीसीआयला धमकीचा मेला पाठवणाऱ्या मेलमध्ये, “जर भारतीय संघ आम्हाला शरण येत असेल तर, आम्ही त्यांना मारणार नाही”, असे लिहिले होते. मात्र तपासाअंती असे लक्षात आले की, हा मेल खोटा आहे. दरम्यान बीसीसीआय ने मुंबई पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यात युवकाची कसून चौकशी करून त्याला मुबंईला पाठवण्यात येणार आहे. चौकशीअंती हा युवक म्हणाल की, हा मेल केवळ बीसीसीआय ला पाठवला होता कोणत्याही खेळाडूला नव्हता. तदनंतर असेही लक्षात आले की, या तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अखेर ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध झाले.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like