बारामतीमध्ये पुन्हा तरुणीवर हल्ला, तोंडावर हातावर सत्तुराने वार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादातून तरुणाने बारामती शहरातील खाटीक गल्लीत एका तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. एका खुनातील आरोपी अल्पवयीन मुलीची तोंडावर वार करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकऱणी पोलिसांनी हल्लेखोर तरुण अरबाज अत्तू कुरेशीला अटक केली आहे. तर महिला गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन दिवसांपुर्वी एका खुनातील आरोपी तरुणीवर हल्ला करण्यात आला होता. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर काल रात्री खाटीक गल्लीमध्ये राहणाऱ्या तरुणीवर अरबाज कुरेशी याने हल्ला चढवला आहे. मुलांच्या खेळण्यावरून दोन दिवसांपुर्वी तरुणीसोबत अरबाज कुरेशी याचे वाद झाले होते. त्यानंतर त्या वादातून काल रात्री अरबाज तिच्या घरी गेला. त्याने तिच्या तोंडावर, हातावर आणि शरीरावर इतर ठिकाणी धारदार सत्तूराने वार केले. यात तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर पोलिसांनी अरबाज कुरेशी याला अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

सिने जगत

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

मोगॅम्बो खुश हुवा ! गुगलचे ‘डुडल’ द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन