अंगावर मोटर सायकल घातल्याचा जाब विचारल्याने केले हाड फ्रॅक्चर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मित्रांसोबत जात असताना एकाने मोटर सायकल अंगावर घातली. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने एकाने चक्क तेथील हॉटेलमधील लोखंडी खुर्चीने मारहाण करून चक्क हातच फ्रॅक्चर केल्याचा प्रकार काळेपडळ येथे समोर आला आहे. याप्रकऱणी हडपसर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत जगताप (प्रशांत डॉन) (रा. भोसलेनगर हडपसर) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात पशुराम महादेव नेवसे (वय ४७, काळेपडळ हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव नेवसे व प्रशांत जगताप हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान बुधवारी रात्री अकराच्या सुमारास ते नेवसे हे त्यांचे मित्र अण्णा कांबळे आणि भगवान कांबळे यांच्यासोबत भोसले नगर येथील कात्रज मिल्क पार्लर हॉटेल समोरून जात होते.

त्यावेळी समोरून प्रशांत जगताप याने भगवान गायकवाड यांच्या अंगावर मोटर  सायकल घातली. त्यामुळे फिर्यागदी नेवसे यांनी त्यांना याचा जाब विचारला. तेव्हा य़ाचा राग आल्याने प्रशांत जगताप याने त्यांच्या हातावर हॉटेलमधील खुर्ची उचलून मारहाण करत जखमी करून फ्रॅक्टर केले. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार घोलप करत आहेत.