फोन उचलला नाही म्हणून तरुणांना दगडाने मारहाण करत कारची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फोन का उचलत नाही म्हणून तरुणाला मारहाण करत त्याला धमकी दिली. त्यानंतर त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून कारची तोडफोड केल्याचा प्रकार इनॉर्बिट मॉल कॉर्नरवर शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली.

याप्रकरणी ओमकार गलांडे व दाद्या जाधव या दोघांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर सौरव संतोष कोडे (वय २१, रा. वडगाव शेरी) य़ाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सौरव कोडे व त्याचा मित्र बंटी हे दोघे कारमधून जात होते. त्यावेळी ओमकार गलांडे याने बंटी याला फोन केला. तो फोन उचलत नसल्याने त्याला आता तू कोठे आहे. तू फोन का उचलत नाही. तुझे हात पाय तोडतो. असे म्हटले. त्यामुळे ते दोघे इनॉर्बिट मॉल येथे गेले.

त्यावेळी रात्री दोनच्या सुमारास इऩॉर्बिट कॉर्नरवर बंटी याला गाडीबाहेर काढून त्याला दोघांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी तरुण त्याला सोडविण्यासाठी गेला तेव्हा त्यालाही डोक्यात दगड मारून जखमी करण्यात आले. तसेच त्याच्या कारची काच फोडण्यात आली. पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like