क्रिकेट खेळताना रागाने बघितल्याच्या कारणावरून बेदम मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेट खेळताना रागाने बघितल्याचा कारणावरून टोळक्याने एकाला मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. 8) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विशाल गार्डन चाकण येथे घडली.

या प्रकरणी हतेश हनुमंत कड (17, रा. विशाल गार्डन, चाकण) याने फिर्याद दिली आहे. तर निखिल प्रदीप राऊत, अमरसिंग सूर्यास (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हतेश हा रविवारी सायंकाळी चाकण येथील विशाल गार्डन जवळ असलेल्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळत होता. यावेळी आरोपींनी ‘तू आमच्याकडे का बघतोस’ असे म्हटल्याच्या कारणावरून हतेशला शिवीगाळ केली. निखिल याने हतेश याला हाताने व लाथेने मारले. अमरसिंग याने दगडाने मारले. तर अन्य आरोपींनी हाताने मारहाण करून दमदाटी केली. यामध्ये हतेश गंभीर जखमी झाला आहे. तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com
उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे