PUBG जीवावर ! किडन्या निकामी झाल्यामुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. दिवसभर पबजी गेम खेळल्यामुळे रितिक कोलारकर या १९ वर्षीय तरुणाला मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. शनिवारी १३ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. गेल्या महिना भरापासून तो डायलिसिसवर होता. पबजी गेम खेळल्यामुळे रितिकच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार चालू होते.

रितिक जून महिन्यात आजारी पडला होता. त्याचे डोळे बंद होत नव्हते. नेत्ररोग तज्ञांकडे त्याला दाखवल्यानंतर रितिकला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी रितिकला सायकोसिस आजार झाल्याचे सांगितले. हा आजार सतत पबजी खेळल्यामुळे झाल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना रितिकची प्रकृती गंभीर झाली. दोन्ही किडन्या निकामी झाल्या. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले. त्याच्यावर सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयातही उपचार करण्यात आले.

रितिक हा स्व. देवराजजी इटनकर आयटीआयचा विद्यार्थी होता. तो मित्रांसोबत तासनतास पबजी गेम खेळत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. रितिकच्या या दुर्देवी मृत्यूमुळे उमरेड शहरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या