दहशत पसरविण्यासाठी शनिवार पेठेत दुचाकी पेटवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकाला मारहाण करत असताना बोलविल्यानंतर तो आला नाही. तसेच परिसरात आपली दहशत असावी म्हणून खुन्नस काढण्यासाठी तरुणाने दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिल्याचा प्रकार शनिवार पेठेतील नेने घाट परिसरात रविवारी घडली. या घटनेत दुचाकीतील साडे सहा हजार रुपयांची रोकड आणि दुचाकी जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनमय मदन पाटील उर्प जीमी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी मेघा महेश कर्वे (३५, लेलेवाडा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कर्वे आणि अनमय पाटील हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. शनिवारी रात्री त्यांची दुचाकी कुणीतरी पेटवून दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा सीसीटिव्ही फुटेजमध्ये त्यांच्याच परिसरातील अनमय पाटील याने ही दुचाकी पेटविल्याचे दिसले. अनमय पाटील हा परिसरात दादागिरी करतो. तो एकाला मारहाण करत असताना फिर्यादींचे पती तेथून जात होते. त्यावेळी त्यांना पाटीलने बोलवले होते. त्यांनी येण्यास नकार दिला. त्यामुळे पाटील याला राग आला होता. त्या रागातूनच शनिवारी रात्री त्याने पार्क केलेली दुचाकी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिली. त्यावेळी दुचाकीच्या डिक्कीमध्ये साडेसहा हजार रुपये ठेवलेले होते. ते जळाले तर दुचाकीही जळाली. यात त्यांचे ६३ हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरात दहशत आपली दहशत असावी म्हणून त्याने दुचाकी पेटविल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पाटील याचा शोध घेतला असता तो पसार झाल्याचे समोर आले आहे. त्याचा शोध घेण्यात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक परगेवार यांनी दिली.

दुचाकी पेटविण्याच्या अर्धा तास आधी एकाला केली मारहाण

अनमय पाटील त्याचे वडील आणि इतरांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून शनिवारी रात्री परिसरातील एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले होते. याप्रकऱणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्यासह निखील प्रकाश जाधव, मदन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी पेटविण्याच्या अर्धा तास आधीच त्याने हा प्रकार केला होता. त्यानंतर त्याने मध्यरात्री दुचाकी पेटवली