कॉलेजातील पोरीला पाहून ‘हस्तमैथुन’ करणारा ‘नतद्रष्ट’ ‘गोत्यात’, लई ‘चोपला’ लोकांनी

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवी मुंबईमधील कामोठे येथील एमजीएम इंजिनीअरिंग कॉलेजच्या परिसरात एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने पीडित विद्यार्थिनीच्या पाठीमागे उभे राहून हस्तमैथुन करण्यास सुरु केले असता लागलीच हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. तिने आरडाओरड करून जमावाच्या मदतीने तरुणाला जागीच चोपले. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या एका नतद्रष्टाला पोलिसांनी अटक केली आहे. विनोद फड (वय वर्ष -३०) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी तरुणाने पीडित विद्यार्थिनीकडे पाहून गुरुवारी दुपारी कॉलेजातील झेरॉक्स सेंटरसमोर हा प्रकार केला. त्या नंतर कॉलेजातील तरुण व पीडित तरुणीने आरोपीला चांगलाच धडा शिकवला त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी हा एमजीएम कॉलेजचाच माजी विद्यार्थी आहे असे समजले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी महाविद्यालयाच्या परिसरातील एका झेरॉक्स सेंटरमध्ये आपल्या निकालाची ऑनलाइन प्रत घेण्यासाठी आली होती. त्यावेळी झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. आरोपीने गपचूप पीडित विद्यार्थिनीच्या पाठीमागे उभे राहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. लागलीच हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. तात्काळ तिने आरडाओरड केली. त्यानंतर जमलेल्या विद्यार्थ्यांनी आरोपीला चांगलाच चोप देऊन महाविद्यालयातील प्राचार्यांना या प्रकाराची माहिती दिली.

त्यानंतर कामोठे पोलिसांना पाचारण करून आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी आरोपी फड याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्राध्यापकाने केला लैंगिक छळ
कामोठे इंजिनीअरिंग कॉलेजातील आणखी एक लैंगिक छळाची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकानेच एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कॉलेजच्या आवारात मोठे आंदोलन केले. महाविद्यालय प्रशासनाविरूद्ध घोषणाबाजीही केली. प्राचार्यासह प्राध्यापकांवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानंतर परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त अशोक दुधे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांची समजूत काढली.

अखेर कॉलेज प्रशासनाकडून प्राचार्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आल्याचे समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like