दभाशी पुलावरुन तापी पाञात उडी मारुन तरुणाची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील तरुणाने तापी पाञात उडी मारुन आत्महत्त्या केल्याचे उघड झाले आहे. अजय बनशीलाल भिल (वय.२१ रा. मोहाडी. न्याहळोद) असे आत्महत्त्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नवनगर येथे बी.ए चे शिक्षण घेत होता. आज घरच्यांना मी परिक्षेला जातो आहे. असे सांगत घरातून निघून गेला. मोटरसायकलने मुंबई आग्रा महामार्गाने दभाशी गावाच्या रस्त्याच्या बाजुला मोटरसायकल पार्कींग करुन तरुणाने तापी नदी पाञात उडी घेत आत्महत्त्या केली. गोताखोरांनी पाण्यात उडी मारुन खोल पाण्यात शोध घेत त्या तरुणांचा मृतदेह नदीपाञातून बाहेर काढला.

पोलीसांनी मोटरसायकल नंबर प्लेटवरील क्रंमाकवरूव व अन्य लोकांच्या मदतीने त्या मयत तरुणांची माहिती मिळविली. त्या तरुणांचे नाव अजय बनशीलाल भिल (वय.२१ रा. मोहाडी. न्याहळोद)  अशी मृताची ओळख पटली असल्याचे शिरपुर पोलीसांनी सांगितले. तरुणाने आत्महत्या का केली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.