धक्कादायक ! कथित पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – याच तरुणीशी लग्न करायचे आहे म्हणत तिला ५ दिवस घरी ठेवल्यानंतर घर सोडून तिच्यासोबत तो राहू लागला. त्यानंतर मात्र तिने आपल्या एका मित्राच्या मदतीने त्याला शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने ४० ते ५० हजार रुपये दिले. परंतु आणखी पैसे घेऊन ये म्हणत त्याला शिवीगाळ, दमदाटी करत त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गणेश बाळासाहेब जगताप (वय २८, रा, उरुळी कांचन) असे आत्महत्या केल्याचे नाव आहे. तर त्याचे वडील बाळासाहेब मारुती जगताप (वय ६५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याची कथित पत्नी सोनाली व तिचा मित्र भीमा गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ मे रोजी त्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास करून गुन्हा दाखल केला.

गणेश हा मासे विक्रीचा व्यवसाय करतो. दरम्यान त्याने अडीच वर्षांपुर्वी सोनाली नावाच्या मुलीला घरी आणले होते. त्याने आईवडीलांशी तिची भेट घालून दिली. त्यानंतर ही माझी मैत्रिण असून तिच्याशीच लग्न करणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्याने तिला घरात ५ दिवस ठेवले. काही दिवसांनी तिच्यासोबत हडपसरला जाऊन राहू लागला.

दरम्यान, त्याच्या खिशात सुसाईड नोटही सापडली आहे. माझ्या बायकोला माझे प्रेम समजले नाही. ते दोघे माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. त्यांना सोडू नका असे त्याने चिठ्ठीत लिहीले आहे.

Loading...
You might also like