home page top 1

महिलेचा खून करून युवकाची आत्महत्या

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – नाजूक कारणातून युवकाने महिलेचा खून करून आत्महत्या केली. श्रीरामपुर शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे.

नीता हौशाराम गोर्डे (वय 42 रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ, वॉर्ड नं. 1) असे मयत महिलेचे नाव आहे. गणेश राधाकृष्ण दळवी (वय 31, रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नीता गोर्डे व गणेश दळवी हे गेल्या काही महिन्यांपासून चंद्रकला थोरात यांच्या खोल्यांमध्ये भाडेकरी म्हणून राहत होते. शनिवारी संध्याकाळची दोघांमध्ये भांडण सुरू झाले. हा वाद वाढत गेला. गणेश याने नीतावर लोखंडी सुर्‍याने वार केले. तिच्या हात, पाय, पोटावर जबर जखमा झाल्या. सुर्‍याचा घाव वर्मी लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. नीताचा मृत्यू झाल्याचे पाहून गणेशने त्याच सुर्‍याने स्वतःच्या अंगावर वार केले. तसेच हाताची नस कापून आत्महत्या केली.

घटनेनंतर काही वेळाने रस्त्याने जाणार्‍या एकाने गणेशचा मृतदेह पाहिला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

याबाबत चंद्रकला शंकर थोरात (वय 52, रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश दळवी याच्या विरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे करीत आहेत.

Loading...
You might also like