धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून युवकाची आत्महत्या

नागपूर : पोलिसनामा ऑनलाइन – नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन हद्दीतल्या जयवंत नगर गल्लीतील आशिस उसरे नावाच्या तरुणाने स्वतःला गोळी मारून घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्याकडे हे पिस्तूल कुठून आले ? त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.

कामठी परीसरात भीषीचे 12 लाख रुपये घेवून पसार झाल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता, याच आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केलीय. अशी माहिती अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एच. एल. उरलागोंडावार यांनी दिलीय. मात्र त्याच्याकडे पिस्तूल कोठून आले याचा पोलीस अद्याप तपास करत आहेत.

एकाच रात्रीत नागपूरात तीन खून –

केडीके कॉलेजजवळ बुधवारी (21 ऑगस्ट) रात्री सैयद इम्रान सय्यद नियाज नामक तरुणाची हत्या करण्यात आली. दुसरी घटना सदर भागातील गोंडवाना चौकात घडली. प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला (वय-50) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिसरा खून दिघोरी परिसरातील सेनापतीनगरात झाला आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी विकी विजय दहाट (वय-32) या तरुणाची हत्या केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like