विधानसभेसाठी युवक काँग्रेसची मोर्चेबांधणी, मागितल्या ‘एवढ्या’ जागा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसची सध्याची हालत आणि पक्षाला लागलेली गळती यामुळे काँग्रेसने तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सूचक वक्त्यव्य युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसने राज्यात ६० जागांची मागणी केल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली. ‘वेक अप महाराष्ट्र’ या युवक काँग्रेसच्या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी नागपूरात आलेल्या सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या काँग्रेसमधून अनेक नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाकरता हा संक्रमणाचा काळ असतानाच काँग्रेसमधील तरुणांसाठी ही संधी असल्याचेही सत्यजीत तांबे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान दर्यापूर आणि अचलपूर या दोन विधानसभेच्या जागा दिल्या नाही, तर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जाण्याची इच्छा राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली आहे. याबाबत लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार, असेही ते म्हणाले. वंचित आघाडीने आघाडीसोबत निवडणूक लढवाव्यात, त्यांचे उमेदवार निवडून येतील, असेही ते म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –