५९ मिनिटात कर्ज द्या, म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांचे बँकेत आंदोलन

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे ५९ मिनीटांत कर्ज उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्टेट बँकांच्या मुख्य शाखेत व्यवस्थापकालाच घेराव घातला. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणबाजीही कतर नोटाबंदीच्या दुसऱ्या वर्षपूर्तीचा निषेधही करण्यात आला. अच्छे दिनाचे आश्वासन देऊन भाजपने सामान्य नागरिकांचा विश्वासघेत केला आहे. या विरोधात काँग्रेस सरकारला उत्तर द्यायला भाग पाडेल असे यावेळी उपस्थित असलेले जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गौरव देशमुख यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेसनुसार ५९ मिनिटांत कर्ज द्यावे, या मागणीसाठी काँग्रेसचे शेखर शेंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्टेट बँकेची मुख्य शाखेत जाऊन आंदोलन केले. यावेळी घोषणेप्रमाणे कर्ज उपलब्ध करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बँक व्यवस्थापकाशी चर्चा करण्यात आली. एमआयडीसी परिसरात जागा उपलब्ध आहे. उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. मात्र, बँक व्यवस्थापकांनी यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून अद्याप कुठलेच निर्देश मिळाले नसल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नोटाबंदीचा दुसरा स्मृतीदिवस पाळत बँकेपुढे निदर्शने केली.

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने स्टेट बँकेपुढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शेखर शेंडे यांच्या नेतृत्त्वाखाली निदर्शने करण्यात आली. २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुघलकी आदेश काढून नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर याचा विपरित परिमाण झाला असून आज दोन वर्षानंतरही याचे फळ लोकांना भोगावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला.