युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षाची आत्महत्या, तालुक्यात खळबळ

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – चिखली तालुका युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सुरडकर यांन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

रमेश सुरडकर हे सकाळी आपल्या घरी होते. दरम्यान त्यांनी सकाळी आईला किराणा आणण्यासाठी पाठवून दिले. आई किराणा आणायला गेली तेव्हा त्यांनी गळफास घेतला. आई परत आल्यावर समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. मुलगा घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी आरडओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेजाऱ्यांनी धाव घेतली.

रमेश सुरडकर हे ३५ वर्षांचे होते. ते युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि आमदार राहूल बोंद्रे यांचे निकटवर्तीय होते. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like