Coronavirus : पुरंदरमध्ये आलेला पाहुणा निघाला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पुरंदर पोलीसनामा न्यूज ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) : पुरंदर तालुक्यातील तोंडल येथे आलेला पाहुणा दोन दिवसाच्या पाहुणचारा नंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाला असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे,असे असले तरी प्रत्यक्ष पुरंदर मधील कोणीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे म्हणत लोकांनी घाबरून न जाण्याचे अवाहन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी नागरिकांना केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हडपसर येथे रहाणारा एक तरूण दि.२२.४.२०२० रोजी तोंडल येथे सास-यांसाठी औषधे घेऊन आला होता.त्याने तोंडल येथे दोन दिवस मुक्काम केला.हडपसर येथील त्याचे मित्र कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासनाने त्याचा शोध घेवुन तपासणी केली असता तो कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या २२ व्यक्तीं आरोग्य विभागाने identify केलेल्या आहेत. त्या पैकी कोणालाही आजपर्यंत काहीही कोरोनाचे लक्षण नाहीत.परंतु प्रोटोकॉल नुसार प्रशासनाने त्या सर्वांना सासवड येथील कोविड केअर सेंटरमध्ये मध्ये ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. तेथून त्यांचे स्त्राव तापसणी करिता पुणे येथे शनिवारी किंवा रविवारी पाठविण्यात येतील असे तहसीलदारांनी सांगितले आहे. चुकून जर तपासनीत पॉझिटिव्ह कोणी आढळुन आले तर या व्यक्तीला पुण्याला पाठवले जाईल अन्यथा त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल ,प्रत्यक्षात पुरंदर तालुक्यात आजपर्यंत कोणीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही.

नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत, व प्रत्येकाने शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सनोबत यांनी केले आहे.पुरंदर तालुका हा पुण्याला लागुन असलेला तालुका आहे मात्र अजुन पर्यंत कोरोनाचा प्रवेश या तालुक्यात झाला नव्हता.मात्र बाहेरून आलेल्या एका व्यक्तीमुळे आता पुरंदर मध्ये सुध्दा कोरोना रूग्ण मिळाल्याची शक्याता निर्माण झाली आहे.