भरदिवसा तरुणावर 16 सपासप वार करून निघृण खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर धारदार हत्याराने 16 सपासप वार करुन खून केला. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास कामठी शहरातील समतानगर भागात घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे. सौरभ सिद्धार्थ सोमकुवर (वय-१८ रा. लुंबिनीनगर, कामठी) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा एका फोटो स्टुडिओमध्ये कामाला आहे. आज दुपारी तो आपल्या वडिलांना बसस्थानक परिसरात सोडून भूयारी मार्गाने घराकडे दुचाकीवरून जात होता. तो समतानगर परिसरात येताच त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्याच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर तब्बल 16 वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सौरभचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कामठी (नवीन) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सौरभच्या नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालायता धाव घेतली. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते.

पार्श्वभूमी गुन्हेगारी
सौरभचा भाऊ चोरीच्या गुन्ह्यामध्ये नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. मोबाल चोरी प्रकरणात मोबाईल आढळून आल्याने सीम कार्डची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सौरभला चौकशीसाठी बोलावून घेतले होते. सौरभचा भाऊ सुरज चोरीचे सामाना शहरातील काही चोरट्यांना देत होता. दोन दिवसांपूर्वी जरीपटका पोलिसांनी कामठी शहरतील या चोरट्यांच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी पोलिसांना चोरीचे सामान सापडले होते. सौरभच आपली माहिती पोलिसांना देत असल्याचा संशय होता. यातूनच त्यांच्यामध्ये वाद झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like