डेंगी रोगावर उपचार घेणाऱ्याचा मृतदेह रेल्वे ट्रेकवर आढळल्याने खळबळ

लोणी काळभोर : पाेलीसनामा ऑनलाईन

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मागील चार दिवसापासून सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये डेंगी रोगावर उपचार घेत असलेल्या संतोष दामू डुबे (वय-३०, रा. डूबेवाडी.(राहू) ता. दौंड) रुग्णाचा मृतदेह रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ हद्दीतील रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्याने उरुळी कांचन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb66c6e3-ca41-11e8-b863-055900cf7e2c’]

लोणी काळभोर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संतोष व त्याची आई अंजूबाई हे दोघेजण डेंगीच्या रोगासाठी सिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये मागील चार दिवसापासून उपचार घेत होते. संतोष व त्याच्या आईवर उपचार चालू होते. संतोष हा चौथ्या मजल्यावर तर त्याची आई पहिल्या मजल्यावर उपचार घेत होते. मात्र रविवारी रात्री दोन -अडीचच्या सुमारास संतोषने बाहेर जाऊन फिरण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र कर्मचार्याने त्याला जाऊ दिले नाही. रविवारी (ता.०७ ) सकाळी एक नातेवाईक संतोष व त्याच्या आईला भेटायला आला होता. त्या दरम्यान तो आईला भेटतो म्हणून सांगुण गेला तो परत आलाच नाही. व नंतर दीड तासाने त्याचा मृतदेह कोरेगाव (ता.हवेली) हद्दीतील प्रयागधाम रोडवरील रेल्वे रुळावर मिळाला. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तरी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.

दरम्यान संतोषचा मृत्यूदेह सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलिस चौकीत आणल्यानंतर संतोषच्या नातेवाईक व कथित शिक्षक पत्रकार मृतदेह चौकीतून हलवावा या मागणीसाठी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संतोषच्या मृत्युच्या कारणांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. अशी मागणी संतोषचे नातेवाईक पोलिसांकडे करत होते. परंतु कथित शिक्षक पत्रकार संतोषच्या मृतदेहासह रुग्णवाहिका पोलीस चौकीच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत होता. यामुळे पोलिस चौकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लोणी काळभोर पोलिसांनी मध्यस्ती करत संबंधित शिक्षक पत्रकाराला चौकीच्या बाहेर हाकलून दिले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c3f46a52-ca41-11e8-a8bd-ed9b8b194e7d’]

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगवले म्हणाले कि, सिद्धी विनायक हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असली तरी संतोष नेमका बाहेर कसा पडला. अन्यथा त्याला कोणी नेले. या तपासासाठी हॉस्पिटलच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत आहेत. सोमवारी अथवा मंगळवारी संतोषच्या नातेवाईकांचेही जबाब घेण्यात येणार आहेत. व पुढील दोन दिवसांत चौकशीनंतर संतोषच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल असे इंगवले यांनी स्पष्ट केले.