Pimpri : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  वेगातील कारने धडक दिल्याने सिग्नल ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी, दि. 15) सकाळी साडेनऊच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

किरण संदीप नखाते (17, रा. दत्तनगर, वाकड) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराचे नाव आहे.

किरण नखाते सकाळी साडेनऊच्या सुमारास डांगे चौकातून ताथवडेच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. डांगे चौकातील सिग्नल ओलांडून ताथवडेच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका प्रवासी कारने किरणच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात किरण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता कारसह पसार झाला. तपास वाकड पोलीस करत आहेत.