दसऱ्यातील धुणं वाळत टाकायला गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

कळंब (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाइन – कळंब तालुक्यातील डिकसळ येथे बुधवारी (दि. 25) दुपारी दीडच्या सुमारास दसऱ्यातील धुतलेले धुणं वाळत टाकण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. घरावरील 33 केव्ही लाईनच्या तारेला कपड्यांचा स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का लागून गणेश मधुकर जाधव (वय 28) याचा जागीच मृत्यू झाला. गणेशच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून महावितरणच्या विरोधात ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
ganesh
या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरण विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा यासाठी कळंब पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. गणेश जाधवचा चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून त्याला तीन व दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.

महावितरण विरुद्ध गुन्हा दाखल करा
ग्रामस्थांच्या निवेदनाला कवडीची किंमत देत केराच्या टोपलीत टाकणाऱ्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे काही महिन्यांपूर्वी खालिद शिकलकर यांचा जीव गेला. तर आज गणेश मधुकर जाधव याचा जीव गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उफाळला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

Visit : policenama.com