Pune News : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   लोहगाव येथील एका तरुणाने दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. 18) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

विष्णू (तात्या) खांदवे (वय 35 रा. हरणतळे वस्ती, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गांधले करत आहेत.